आंबी : फिर्यादी नामे-धनाजी लहु मांडवे, वय 34 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 30.06.2024 रोजी 22.00 ते दि. 01.07.2024 रोजी 03.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लाकडी कपाटातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50,000₹ असा एकुण 1,30,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-धनाजी मांडवे यांनी दि.02.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे-जितेंद्र अशोक चव्हाण, वय 37 वर्षे, रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची म्हैस ही दि. 15.06.2024 रोजी 23.00 ते दि. 16.06.2024 रोजी 06.00 वा. सु जितेंद्र चव्हाण यांच्या राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जितेंद्र चव्हाण यांनी दि.02.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-अलोक नदीराम श्रीमनी, वय 34 वर्षे, मोहतरापुर ता. नालुवा जि.1 साउथ 24 परनगाज पश्चिम बंगाल हे दि. 01.07.2024 रोजी 00.20 ते 04.50 वा. सु. कंटेनर क्र एम.एल. 01 क्यु 3779 हा इटकळ शिवारात एनएच 65 रोडवर भैरवनाथ पॉल्ट्री फार्मच्या जवळ उभा करुन झोपले असता अज्ञात व्यक्तीने कंटेनर मधील 275 लिटर डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अलोक श्रीमनी यांनी दि.02.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.