• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 23, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

• दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

admin by admin
July 3, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना
0
SHARES
456
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Previous Post

आंबी, तामलवाडी, नळदुर्ग येथे हाणामारी

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बीडच्या महिलेला पळवून आणले

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बीडच्या महिलेला पळवून आणले

ताज्या बातम्या

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करा

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करा

June 23, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

बेंबळी: कत्तलीसाठी चालवलेली गोवंश वाहतूक रोखली; दोघांवर गुन्हा दाखल

June 23, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात भर चौकात चाकू बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

June 23, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तोरंबा येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

June 23, 2025
विठ्ठल आणि वारकरी: माऊली-लेकराचे नाते…

विठ्ठल आणि वारकरी: माऊली-लेकराचे नाते…

June 23, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group