धाराशिव – बीड माहेर आणि छत्रपती संभाजीनगर सासर असलेल्या एका महिलेला मैत्रिणीच्या माध्यमातून भूम शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या घरामध्ये बोलावून, बेडरूममध्ये सोबत झोपण्याची इच्छा व्यक्त करून नंतर दुसऱ्या दिवशी आय लव्ह यु म्हणत जवळ ओढून किस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे, त्यांची मैत्रीण सुनीता गोविंद मस्के यांच्यावर भूम पोलीस स्टेशनमध्ये दि. २२ जून रोजी भादंवि ३५४, ३५४ ( A ) , ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यापूर्वीच दि. १८ एप्रिल २०२४ रोजी सुनीता मस्के हीचा पती गोविंद काकासाहेब मस्के ( रा. बीड ) याने धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्याविरुद्ध पत्नीस आर्थिक व नोकरीचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने सपोनि शिंदे यांनी आणखी मोठा कारनामा केला.
सुनीता मस्के हिच्याबरोबर आपला १६ वर्षे सुखाचा संसार सुरु होता. आपणास तीन अपत्येही आहेत. असे असताना विवाहित असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांनी आपल्या पत्नीस फूस लावून पळवून नेले असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दि. २५ मार्च २०२४ रोजी मिसिंगची तक्रार दाखल आहे. त्यानंतर दि. १८ एप्रिल रोजी धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. सपोनि शिंदे हा सुनीता मस्के हिच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात ओढण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे.
गोविंद काकासाहेब मस्के यांची तक्रार जसेच्या तसे …