• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 30, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेजारील राज्यांमध्ये दुधाचे दर जास्त आपल्याच राज्यात दूध दर कमी का ?

आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल?

admin by admin
July 4, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
0
SHARES
33
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शेजारील राज्यांमध्ये दुधाचे दर हे आपल्या राज्यापेक्षा अधिक आहेत. आपल्या राज्यात इतर राज्यापेक्षा दर कमी का याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत सभागृहात व्यक्त केले. अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते.

निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार पाटील यांनी शेतकरी, विद्यार्थी, महिला, मुली यासह वेगवेगळ्या समाज घटकांना न्याय देण्याची मागणी यावेळी सभागृहात केली.

दुध दरावर बोलताना पाटील यांनी सरकारला घेरले. राज्यात 25 ते 33 रुपये दर आहेत. तर शेजारील गुजरात येथे 34 ते 36,तेलंगणा 39 ते 40, कर्नाटक 32 ते 36, आंध्रप्रदेश 33 ते 37 रुपये इतका दुधाला भाव मिळतो. इतर राज्यात दर अधिक असताना आपल्याच राज्यात हे दर कमी का असा प्रश्न पाटील यांनी सरकारला विचारला. दुधाला अनुदान म्हणून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला पण अगोदर केलेल्या अनुदानची रक्कम दूधउत्पादक यांना मिळाले नसल्याकडं त्यांनी लक्ष वेधले. सोयाबीनला प्रति हेक्टर अनुदान देण्याच्या घोषनेवर आ. पाटील म्हणाले की, हे अनुदान खूपच कमी असून सद्या सोयाबीनचा दर साडेचार हजार आहे, जो दर 2021-22 रोजी 11 हजारावर गेला होता मात्र तेव्हा केंद्र सरकारने डिओसी आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दर खाली आले आता अनुदानापोटी दिली जाणारी रक्कम शेतकऱ्यांना एका क्विंटलची आहे. त्यामुळे दुहेरी इंजिन सरकार आता तरी डिओसी आयात थांबवावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली.

पीककर्ज न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याच्या नुसत्या घोषणा होतात पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही. राईट ऑफ, सिबिलसह इतर कारण सांगून बँका आजही कर्ज देत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांना सावकाराकड जाण्याची वेळ येत असल्याचे आ. पाटील म्हणाले.

मुलींना शैक्षनिक शुल्क माफी देण्याचा निर्णय घेतला असला तरी या योजनेत पहिल्यांदा शंभर टक्के फीस भरावी लागणार आहे. सध्या पालकांना एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याच आ. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे फी भरायची सक्ती करू नये अशी मागणी त्यांनी केली.

बार्टी, सारथी व महाज्योती अंतर्गत पीएचडी करणाऱ्याना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. त्याबाबत देखील लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच मातंग समाजासाठी आरटी व मुस्लिम समुदायासाठी मौलाना आझाद रिसर्च योजना जाहीर केली आहे.पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही, ती लागू करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बीडच्या महिलेला पळवून आणले

Next Post

कळंब, धाराशिव , ढोकी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब, धाराशिव , ढोकी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group