कळंब : फिर्यादी नामे-शाहरुख सत्तार बागवान, वय 29 वर्षे, रा. गांधीनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹किंमतीची काळ्या रंगाची होंडा सीबी शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएम 7355 ही दि.01.07.2024 रोजी 22.30 ते दि. 02.07.2024 रोजी 06.30 वा. स.शाहरुख बागवान यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शाहरुख बागवान यांनी दि.03.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-अमोल मनोहर काळे, वय 27 वर्षे, र. देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव यांचे तिरुपती हेल्थ कॉर्नर मेडीकल व अशोक भारत मुंडे यांचे अभिराज ट्रेडर्स सिमेंट दुकानाचे शटर पट्टीचे कोंडे अज्ञात व्यक्तीने दि. 02.07.2024 रोजी 08.00 ते दि. 03.07.2024 रोजी 09.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन असे दोन दुकानातील काउंटरमधील 5,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल काळे यांनी दि.03.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता 2023 कलम 331 (4), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-बालाजी धिरसिंग राठोड, वय 35 वर्षे, रा. मुक्तेश्वर कॉलनी, धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची काळा पट्टा असलेली मोटरसायकल क्र एमएच 25 एस5639 ही दि.30.06.2024 रोजी 21.00 ते दि. 01.07.2024 रोजी 04.00 वा. सु. मुक्तेश्वर कॉलनी धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी राठोड यांनी दि.03.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : दि.03.07.2024 रोजी 17.30 वा.सु. दत्त टेकडीवर असलेले मंदीराचे शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन स्टिलचे लोखंडी बार 15, खोऱ्या 1 स्टिर बार 16, पाईप लाईनचे टी. बायडींग वायर बंडल असा एकुण 28,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या राजपाल गुणवंतराव देशमुख, वय 50 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.03.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 334 (1), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
येरमाळा : आरोपी नामे-बालाजी चंद्रसेन माने, मुद्रीका चंद्रसेन माने दोघे रा.शिंगोली, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.09.06.2024 रोजी 09.30 वा. सु. शिंगोली शिवारातील गायरान येथे फिर्यादी नामे- पांडुरंग चंद्रसेन माने, वय 44 वर्षे, रा. शिंगोली, ता. कळंब, जि. धराशिव यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,कुऱ्हाडीचे तुब्यांने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी या भांडण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळकरुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पांडुरंग माने यांनी दि.03.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 325, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.