धाराशिव : जिल्ह्यातील लोहारा आणि परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन विवाहित पुरुषांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(3) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहारा तालुक्यातील घटना :
होळी (ता. लोहारा) येथील गोविंद शिवाजी राठोड (वय ३०) हे २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांचे गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या अपहरण करून नेल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी ललीता गोविंद राठोड (वय २६) यांनी १५ ऑक्टोबर रोजी लोहारा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंड्यातील दुसरी घटना :
परंडा शहरातील संगम पार्क येथील इरफान रसुल शेख (वय ३४) यांचे १३ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण करून नेल्याची तक्रार त्यांच्या पत्नी हिना इरफान शेख (वय ३०) यांनी १५ ऑक्टोबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरूनही भा.न्या.सं. कलम 140(3) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमध्ये अपहरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.



