धाराशिव : आरोपी नामे-आच्युत भास्कर हजारे, वय 30 वर्षे, रा. वाडीवाघोली ता.जि. लातुर यांनी भोसले हायस्कुल परिसरातुन हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 14 सीटी 4333 अंदाजे 40,000₹ किंमतीची ही चोरुन घेवून जात असताना दि. 25.03.2024 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. बसस्थानक समोरील रोडवर धाराशिव येथे आनंदनगर पोलीसांना मिळुन आला. यावरुन फिर्यादी नामे- राजेश कांताराम शेटे पोलीस हावलदार- 690 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी नमुद आरोपीविरुध्द दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 107/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
आंबी : आरोपी नामे-विलास भारत घोडके, 2) बेलेश्वर दत्तात्रय गुडे, रा. आवारपिंपरी ता. परंडा, 3)अभिषेक अजिनाथ गुडे, 4) वैभव लक्ष्मण गुडे, 5) सुजित दिगंबर गुडे सर्व रा. आवार पिंपरी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 25.03.2024 रोजी 12.50 वा. सु. आनाळा ते कडांरी रोडवर आनाळा गावाचे शिवारात ता. परंडा जि. धाराशिव सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली सह एक ब्रास वाळू 6,05,000₹ किंमतीची व स्वराज कंपनीचा एक्स टी 744 ट्रॅक्टर व ट्रॉली सह एक ब्रास वाळू 7,05, 000₹ किंमतीची असा एकुण 13,10,000₹ किंमतीचे लाबाडीच्या इराद्याने गौनचनिज वाळु चोरु करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवून जात असताना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामेरामकिसन दगडु कुंभार, वय 35 वर्षे नेमणुक पोलीस स्टेशन अंबी यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 379, 114, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : आरोपी नामे-1) अमोल राजेंद्र शिंदे, वय 28 वर्षे, 2) अमर सुभष शिंदे, वय 22 वर्षे, 3) अमर हणुमंत यादव, वय 30 वर्षे, 4)सुरज अदलिंगे वय 32 वर्षे, सर्व रा. आसु ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 30.09.2023 रोजी 00.30 वा. सु. आसु ता. परंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे महादेव मंदीरा जवळ रोड लगत आसे येथुन फिर्यादी नामे- मारुती पंडु शिंदे, वय 32 वर्षे, रा. लोणी ता. परंडा जि. धाराशिव यांच्या मारुती आल्टो कार 800 क्र एमएच 14 डीएक्स 3302 च्या चोरी करण्याच्या उद्देशाने सर्व काचा फाडून दरवाज्याचे लॉक तोडून गाडीतील पुढच्या ड्राव्हर मधील रोख रक्कम 10,000₹ तसेच हवा भरणेच्या चार्जर चोरुन नेले. तसेच गाडीच्या सर्व काचा व दरवाज्याचे लॉक तोडून अंदाजे 40,000₹ चे नुकसान केले. वगैरे मा. न्यायलयाचे जा. क्र. फौ 430/2024 न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परंडा कोर्ट नं 3 अन्वये एम केस वरुन फिर्यादी नामे मारुती पंडू शिंदे, वय 32 वर्षे रा. लोणी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 379, 427, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.