धाराशिव : मयत नामे- विशाल महेश साळुंके, वय 19 रा. आळणी ता.जि. धाराशिव, 2)विनोद दगडु घोटाळे, वय 29 वर्षे रा. येडशी ता. जि. धाराशिव हे दोघे दि.28.04.2024 रोजी 20.00 वा. सु. एनएच 52 रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एच.4565 यावरुन येडशी कडे जात होते. दरम्यान उपळा मा. पाटीचे ब्रीज खाली ता. जि. धाराशिव येथे अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून विशाल साळुंके व विनोद घोटाळे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात विशाल साळुंके व विनोद घोटाळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश शिवाजी साळुंके, वय 42 वर्षे, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 134 (अ) (ब) मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
मुरुम : आरोपी नामे-1) शेषेराव लिंबन सुरवसे, 2)शेषेराव सुरवसे, 3)समर्थ शेषेराव सुरवसे, रा. काळ निंबाळा ता. उमरगा जि. धाराशिव, 4)अर्जुन महादेव जाधव, रा. काझी कनबस्त, ता. अक्कलकोट यांनी दि.17.05.2024 रोजी 15.45 वा. सु. काळनिंबाळा शिवारात फिर्यादी नामे- बब्रुवान भगवान सुरवसे, वय 55 वर्षे, रा. काळनिंबाळा प. ता. उमरगा जि. धाराशिव यांना त्यांचा मुलगा अजीत सुरवसे यांना नमुद आरोपींनी शेतातुन म्हैस हाकलुन लावल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बब्रुवान सुरवसे यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी नामे-प्रकाश पवार, 2) रवी जाधव, 3) अजय बिराजदार, 4() अनिकेत बिराजदार, 5) ओमकार सावंत,6) कमलाकर पांचाळ, 7) शैलेश सुतार, 8) शुभम राजपुत सर्व रा. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.18.05.2024 रोजी 20.00 वा. सु. जकेकुर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात फिर्यादी नामे- आदेश बाळु जोटीथोर, वय 19 वर्षे, रा. खेड ता. लोहारा जि. धाराशिव ह.मु. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तु गावातील जयंती मिरवणुकीमध्ये खुप मोठ्याने घोषणा देवून आमच्याकडे खुन्नस मध्ये बघून नाचत होता असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने पोटवर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आदेश जोटीथोर यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह कलम 3(1),(आर), 3(1)(एस), 3(2), (व्ही.अ.) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.