• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारणीच्या नावाखाली गुंडगिरी आणि भ्रष्टाचार

तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्यांना धमक्या, मारहाण; नियम धाब्यावर

admin by admin
December 27, 2024
in मुख्य बातमी
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
963
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यात, विशेषतः तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई, मुर्टा, बारुळ, होर्टी, गंधोरा आदी गावांमध्ये पवनचक्की उभारणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेकेदारांकडून गुंडाच्या मदतीने धमकावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या गुंडगिरीत जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तर यापूर्वी बारुळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती.

तुळजापूर तालुक्यात Renew कंपनीकडून पवनचक्की उभारणीचे काम सुरू असून, त्याचा मुख्य ठेकेदार रजा मुराद याने अमोल लाखे पाटील यास ठेका दिला आहे. अमोल लाखे पाटील हाच गुंडगिरी करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलीसांना हाताशी धरून हे ठेकेदार बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याचा आरोप होत आहे. पवनचक्की उभारणी करताना अनेक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचेही उघडकीस आले आहे.

नियमांची होणारी पायमल्ली:

  • पवनचक्कीची जमीन अकृषी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावा लागतो. मात्र, या प्रक्रियेत लाखो रुपयांची लाचखोरी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
  • खोदकाम करताना तहसीलच्या गौण खनिज विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र, अधिकाऱ्यांना लाच देऊन ही परवानगी मिळवली जात आहे.
  • पवनचक्की उभारणी करताना एक किलोमीटर अंतरावर घर किंवा वस्ती नसावी, दोन पवनचक्क्यांमध्ये सव्वा किलोमीटर अंतर असावे आणि हायवेपासून किमान सव्वा किलोमीटर अंतर असावे, असे नियम आहेत. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक:

  • एक पवनचक्की उभारणीसाठी ११ गुंठे जागा लागते, मात्र ७ एकर जागा अधिग्रहण केली जाते. शेतकऱ्यांना किमान ४५ लाख रुपये दिले पाहिजेत, मात्र २५ ते २९ लाख रुपये दिले जात आहेत. उर्वरित रक्कम दलाल गिळंकृत करीत आहेत.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता जातो, त्यांना प्रति गुंठा ३० हजार रुपये द्यायला हवेत. मात्र, १५ हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम दलाल खाऊन टाकत आहेत.

या सर्व प्रकारात शासकीय अधिकारी, पोलीस आणि दलाल यांची साठगाठ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Previous Post

पवनचक्की प्रकरण: सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला: गुन्हेगारीचे नवे टोक

Next Post

लोहारा : कुत्र्याला मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

लोहारा : कुत्र्याला मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ: घरफोडी, दुचाकी आणि विजेच्या तारेची चोरी; तिन्ही प्रकरणी गुन्हे दाखल

March 12, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंब: जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; १५ ते १८ जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण

March 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार;

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची तक्रार केल्याचा राग; वाघोलीत ५६ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नाचताना पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर लोखंडी कत्तीने हल्ला

March 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group