धाराशिव: एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला लाजवेल अशी पटकथा सध्या धाराशिवच्या जिल्हा परिषद निवडणुकीत लिहिली जात आहे. आज दिवसभर ‘माऊली’ ‘अर्चना पाटील’ यांच्या उमेदवारीवरून जे नाट्य घडलं, त्याने राजकीय पंडितांची डोकी चक्रावून गेली आहेत. एकीकडे मुलाने ‘माघारी’ची कुजबूज केली, तर दुसरीकडे पतीने “मी पेपर फोडणार नाही, दोन दिवस कळ सोसा,” असं सांगत सस्पेन्स वाढवला आहे. नक्की स्क्रिप्ट कुणाची खरी? मुलाची की नवऱ्याची ?
🤫 मल्हाररावांची ‘कुजबूज’ आणि मीडियाचा गोंधळ!
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. वातावरण तापलेलं. अशातच अर्चना पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी एका पत्रकाराच्या कानात हळूच सांगितलं, “माझी आई माघार घेणार आहे.” झालं! वाऱ्यासारखी बातमी पसरली. अनेक चॅनेल्सनी ‘ब्रेकिंग’ चालवली की अर्चना पाटील आऊट!
पण *’धाराशिव लाइव्ह‘*ने मात्र तेव्हाच ओळखलं होतं की हा “इमोशनल ड्रामा” असू शकतो. हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असावा, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. आणि झालंही तसंच!
🏏 ५ वाजता राणा पाटलांची ‘एन्ट्री’ आणि सस्पेन्सचा ‘ब्लास्ट’!
मल्हार पाटलांच्या वक्तव्याने वातावरण ढवळून निघालं असतानाच, सायंकाळी ५ वाजता खुद्द भाजप आमदार आणि अर्चना ताईंचे पती राणा जगजितसिंह पाटील पत्रकारांसमोर आले.
सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. पत्रकारांनी थेट विचारलं, “दादा, ताई माघार घेणार का?”
यावर राणा पाटलांनी चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता, आपल्या खास शैलीत उत्तर दिलं:
“मी आताच पेपर फोडणार नाही… दोन दिवस वाट पाहा!”
❓ घरातच ‘स्क्रीप्ट’ वेगळी की सोयीस्कर गोंधळ?
राणा पाटलांच्या या एका वाक्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण केला आहे.
-
मुलगा (मल्हार पाटील): म्हणतोय आई लढणार नाही.
-
पती (राणा पाटील): म्हणतात सस्पेन्स कायम आहे.
आता प्रश्न पडतोय की, घरातच संवाद नाही की हा ‘बाप-बेट्याचा’ ठरवून केलेला राजकीय डाव आहे? “पेपर फोडणार नाही” याचा अर्थ परीक्षेत (निवडणुकीत) काहीतरी वेगळंच घडणार आहे का? की उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विरोधकांना (विशेषतः सक्षणा सलगर यांना) गाफील ठेवण्याची ही खेळी आहे?
मल्हार पाटलांनी ‘सिंथी’ गोळा करण्यासाठी माघारीची पुडी सोडली, तर राणा पाटलांनी ‘सस्पेन्स’ ठेवून विरोधकांचे टेन्शन वाढवले. आता येत्या दोन दिवसांत हा ‘पेपर’ फुटणार की विरोधकांची विकेट पडणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे! धाराशिव फाइल्सचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे!





