• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, November 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सोयाबीन चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद

धाराशिव पोलिसांचा मालाविषयक गुन्ह्यातील यश

admin by admin
January 25, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धारशिव – धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी केली आहे. शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोयाबीन चोरी प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीचे २४.६२ क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, फहरान पठाण, चालक पोलीस अंमलदार रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांचे पथक काम करत होते. या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी बबलू फुलचंद पवार (रा. पिंपळगाव डोळा पारधीपिडी, ता. कळंब) याने आपल्या साथीदारांसह मंगरुळ शिवारातील सोयाबीनची चोरी केली आहे.

या माहितीच्या आधारे पथकाने मंगरुळ शिवारात सापळा रचला. तेथे बबलू पवार हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार त्याचा साथीदार दादा फुलचंद पवार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींकडून २४.६२ क्विंटल सोयाबीनचे ४५ पोते जप्त करण्यात आले आहेत. या सोयाबीनची किंमत १,००,९४२ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना शिराढोण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Previous Post

एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे भाडेवाढ करणे अपरिहार्य – परिवहन मंत्री

Next Post

धाराशिवमध्ये घरात घुसून आई-मुलावर हल्ला

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये घरात घुसून आई-मुलावर हल्ला

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

 निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण

November 21, 2026
एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

November 21, 2026
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!

November 20, 2026

Recent Posts

  • धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम
  •  निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल
  • धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण
  • एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर
  • ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!