ढोकी : जखमी नामे- वसंतराव दादाराव माळी, वय 60 वर्षे रा. राजेश नगर ढोकी ता. जि. धाराशिव हे दि.14.02.2024 रोजी 17. 00 ते 17.14 वा. सु. एमएसईबी जवळील ग्रामपंचायत शॉपींग सेंटर समोरुन ढोकी येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 4454 ही वरुन जात होते. दरम्यान आरोपी नामे रोहन गुणवंत कावळे, रा. कावळेवाडी ता. जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून वसंतराव माळी यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात वसंतराव माळ हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वसंतराव माळी यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : जखमी नामे-श्रीकांत राजेंद्र बिराडे, वय 25 वर्षे, व सोबत शुभम बब्बें वय 18 वर्षे रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 6385 वरुन जात होते. दि.13.12.2023 रोजी 13.30 वा. सु.मुरुम शिवारात कंटेकुर व आष्टाकासार जाणारे चौकात मुरुम कडून येणारे ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएस 0958 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हे हायगई व निष्काळजीपणे चालवून रोडवर अचानक ट्रॅक्टर वळवून श्रीकांत बिराडे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात श्रीकांत बिराडे व शुभम बब्बें हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीकांत बिराडे यांनी दि. 19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम 279, 337, 338, सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
बेंबळी :आरोपी नामे-1) अमोल रंगनाथ नवले, 2) संजय रंगनाथ नवले, 3) दत्ता रंगनाथ नवले, 4) रंगनाथ लिंबराज नवले, 5) गणेश सोमनाथ नवले, 6) सोमनाथ लिंबराज नवले, सर्व रा. शिंदेवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि. 18.02.2024 रोजी 20.00 वा. सु. शिंदेवाडी येथे फिर्यादी नामे- किसकिंदा चंद्रकांत नवले, वय 52 वर्षे, रा. शिंदेवाडी ता. धाराशिव ह्या व त्यांचे पती व मुलगा यांना नमुद आरोपींनी मोटरसायकलवर बसल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-किसकिंदा नवले यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.