धाराशिव जिल्ह्यातील ढोकी, भुम आणि परंडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाणीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
ढोकी: दि. ७ डिसेंबर रोजी साठेनगर येथे शेत व जागा वाटणीच्या कारणावरुन लोभाजी पांडुरंग बगाडे (वय ४०) यांनी पांडुरंग किसन बगाडे (वय ७३) यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व फरशीच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
भुम: दि. ५ डिसेंबर रोजी दुधोडी गावातील हनुमान मंदिराजवळ मागील भांडणाचे कारणावरुन अनुरथ बाबासाहेब गावडे, बाबासाहेब रामभाउ गावडे, भागवत रामभाउ गावडे, कमलबाई बाबासाहेब गावडे यांनी बबन महादेव गिरी (वय ४८) यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
परंडा: दि. ७ डिसेंबर रोजी मानकेश्वर शिवार हनुमंत पिठमागे शेतात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गोरख पंढरी मस्तुद व शनि गोरख मस्तुद यांनी लहु भिमा घोडे (वय ३५) यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले.
तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भादंवि कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.