नळदुर्ग : आरोपी नामे-आनंद बालाजी भोसले, बालाजी राजकुमार भोसले, शैलेश राजकुमार भोसले, तिघे रा. दिंडेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.19.05.2024 रोजी 08.30 वा. सु. बालाजी राजकुमार भोसले यांचे घराजवळ दिंडेगाव येथे फिर्यादी नामे-सोपान गोविंद क्षिरसागर, वय 65 वर्षे, रा. दिंडेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मोटर सायकलने धडक देवून जखमी केले. व जातीवाचक शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने बोटावर मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सोपान क्षिरसागर यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 326, 323, 504, 506, 34 सह अ.जा.ज.अ. प्र.कायदा कलम 3(1)(आर)(एस), 3 (2) (व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-बापुराव राजाभाउ सुरवसे,(मेढेकर), सिध्दांत बापूराव सुरवसे,(मेढेकर),संतोष माणिक सुरवसे ,(मेढेकर), खंडु महादेव सुरवसे (मेढेकर), धिरज खंडु सुरवसे (मेढेकर), सुरज खंडु सुरवसे,(मेढेकर), सर्व रा. सुंभा ता. जि. धाराशिव यांनी दि. 17.05.2024 रोजी 19.00 वा. सु. जागजी शिवारातील पेट्रोल पंपाजवळ फिर्यादी नामे-गणपती देविदास मुळे, वय 54 वर्षे, रा. सुंभा ता. जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, लोखंडी गज, कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणपती मुळे यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हायगयी व निष्काळजीपणे वाहन व यंत्र चालवून मरणास कारणीभूत
बेंबळी : आरोपी नामे- सुकुमार जिनाप्पा बसरगे, रा. मजेरवाडी ता. जि कोल्हापुर यांनी दि. 24.05.2024 रोजी 23.00 ते दि 25.05.2024 रोजी 07.00 वा. सु. ताकविकी शिवार आण्णासाहेब गिराम यांचे शेतात त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर क्र एमएच 25 एस 3891 हा हायगयीने व निष्काळजीपणे चालविलेने यातील मयत नामे- तानाजी गोरोबा डोलारे, वय 55 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव हे ट्रॅक्टर/ रोटर मध्ये सापडून गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद आरोपीने मयतावर कोणतेही उपचार न करता व अपघाताची माहिती न देता मयताचे प्रेत घटनेच्या ठिकाणावरुन निलंगे यांचे शेताचे बाजूला असलेल्या कॅनलमध्ये टाकून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मेसुबाई तानाजी डोलारे, वय 50 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 304(अ), 287, 201 भादवि सह कलम 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.