परळी: येथील एका डॉक्टरने दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पीडित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डॉ. यशवंत ऊर्फ दुष्यंत देशमुख यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील एका कंपनीत काम करणारी ही तरुणी तब्येत ठीक नसल्याने एक महिन्यापासून परळीत आई-वडिलांकडे राहत होती. शुक्रवारी सायंकाळी ती मैत्रिणीसह डॉ. देशमुख यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली असता, तपासणीच्या वेळी डॉक्टरने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला. तरुणीने आरडाओरड केल्यावर तिला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी शहरात बंद पाळला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांच्या कृत्याचा निषेध करत त्याला अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, गुन्हा दाखल होताच डॉ. देशमुख फरार झाला आहे.
पुण्यातील एका कंपनीत काम करणारी परळीतील २१ वर्षीय युवती तब्येत ठीक नसल्याने एक महिन्यापासून परळी येथे तिच्या आई-वडिलांकडे राहत आहे. शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) सायंकाळी ७.३० वाजता ती तिच्या एका मैत्रिणीला घेऊन डॉ.यशवंत ऊर्फ दुष्यंत देशमुख यांच्या शहरातील कृष्णा टॉकीजसमोरील दवाखान्यात उपचारासाठी आली होती. परळी शहरात तरूणीचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या डॉक्टराच्या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. शहरातील व्यापाऱ्यांनी घटनेच्या निषेधार्थ आपली दुकाने सकाळ पासून बंद ठेवत कडकडीत बंद पाळला