उमरगा: उमरगा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, कदेर येथील गोपाळ मठपती यांना बाळू आणि अमोल चौधरी या दोघा भावांनी शेत रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, इलेक्ट्रिक बॅटरी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी २९ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, सावळसुर येथील धेंडीराम बिराजदार यांना ईश्वर माने याने शेतामध्ये रोटर न विचारता का मारला या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यालाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी २९ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे का, याबाबत माहिती उपलब्ध नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सावंतवाडीत मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी येथे मागील भांडणाचे कारणावरून तिघांनी एका व्यक्तीला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातलिंग धन्यकुमार बडबडे (वय ४३, रा. सावंतवाडी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवशंकर गुरुलिंग गाजरे, भिमराव पांडुरंग शिंदे (दोघेही रा. सावंतवाडी) आणि भैरीनाथ पांडुरंग कदम (रा. खुंटेवाडी) या तिघांनी बडबडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगड आणि काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
बडबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(२), ११५(२), ३२४(४), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.