• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

एकीकडे नकार, दुसरीकडे साथ – धस साहेब, हे काय चाललंय?

खंडणीखोरीचा हा "विशाळ" खेळ कधी संपणार?

admin by admin
March 15, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
 आ. सुरेश धस साहेब,एका चिल्लर, ब्लॅकमेलर, खंडणीखोरासाठी स्वतःची अब्रू घालवू नका!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  जिल्ह्यात खंडणीखोरीचा एक सुळसुळाट सुरू असून, त्याचा केंद्रबिंदू बनलेला आहे आशिष विशाळ! कोणत्याही कायदेशीर उत्पन्नाचा स्रोत नाही, कसलीही नोकरी नाही, तरीही बँक खात्यात कोटींच्या ठेवी आणि लाखोंच्या गाड्या! हा पैसा आला कुठून? याचा सुगावा लागत नाही, पण शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे, तक्रारींच्या माध्यमातून पैशांची उकळपट्टी करणे आणि मोठ्या नेत्यांच्या छत्रछायेखाली वावरणे – हेच त्याचे प्रमुख उद्योग आहेत.

आ. सुरेश धस आणि आशिष विशाळ – हात वर की हातमिळवणी?

एकेकाळी धाराशिव, बीड आणि लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार असलेल्या आ. सुरेश धस यांच्या छायेत हा आशिष विशाळ बहरला. त्यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करून धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी करणे, चौकशी लावणे, आणि नंतर खंडणी मागणे – हेच त्याचे सूत्र होते. यातूनच तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येळगट्टे यांना सहा महिने तुरुंगाची हवा खावी लागली.

मात्र, यावरून काहीही धडा न घेता, हा ‘तक्रारीबहाद्दर’ व्यापारी, बिल्डर, सरकारी कर्मचारी अशा अनेकांना लक्ष्य करत राहिला. सरतेशेवटी त्याच्या या धक्कादायक कारवायांना जरांगे समर्थक कंटाळले आणि भररस्त्यात त्याला धडा शिकवला. पण जणू काही हे अपयश पचवायला त्याला जमत नव्हते! मुंबईत विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी तो पुन्हा आ. सुरेश धस यांच्या मागे फिरताना दिसला आणि त्याचे खेळखंडोळ झाले.

एकीकडे नकार, दुसरीकडे साथ – धस साहेब, हे काय चाललंय?

आ. सुरेश धस यांनी यापूर्वीच “आशिष विशाळशी माझा काहीही संबंध नाही” असे जाहीर केले होते. परंतु, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे “तो माझा सहकारी आहे” असे म्हटले आहे! मग प्रश्न असा आहे की, आधी नाते नाकारायचे आणि आता उघड कबुली द्यायची – या उलटसुलट भूमिकेमागे कोणता डाव आहे?

जर सुरेश धस यांचा विशाळशी काहीही संबंध नव्हता, तर तो त्यांच्या लेटरपॅडचा वापर कसा करत होता? त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? पोलीस आणि जिल्हा प्रशासन गप्प का बसले?

दबाव कुणाचा? चौकशी कधी?

मनसेचे पाशाभाई शेख आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित ओव्हाळ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे, पण ती अद्याप धूळखात का पडली आहे? आशिष विशाळच्या वर कोणाचा वरदहस्त आहे, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही? जर एक सामान्य नागरिक दोन कोटींच्या ठेवी ठेवतो आणि लाखोंच्या गाड्या बाळगतो, तर त्याची उत्पन्नाची चौकशी का केली जात नाही?

आता हे थांबलं पाहिजे!

हा गुन्हेगारीचा खेळ संपवायचा असेल, तर यामागील मास्टरमाइंड कोण आहेत, हे उघड व्हायला हवं. केवळ आशिष विशाळलाच लक्ष्य करून उपयोग नाही, तर त्याला अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांचीही पोलखोल झाली पाहिजे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास जनतेचा संताप उफाळेल, आणि मग रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही!

सवाल एवढाच – कायदा खरोखरच अंध आहे की, निवडक लोकांसाठीच तो दुर्लक्ष करतो?

Previous Post

 आ. सुरेश धस साहेब,एका चिल्लर, ब्लॅकमेलर, खंडणीखोरासाठी स्वतःची अब्रू घालवू नका!

Next Post

ते पत्र माझे नाही आणि सहीही माझी नाही. कुणीतरी खोडसाळपणा केला – आ. सुरेश धस

Next Post
ते पत्र माझे नाही आणि सहीही माझी नाही. कुणीतरी खोडसाळपणा केला – आ. सुरेश धस

ते पत्र माझे नाही आणि सहीही माझी नाही. कुणीतरी खोडसाळपणा केला - आ. सुरेश धस

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : टेलरिंगच्या दुकानात घुसून १० हजारांची खंडणी मागत टेलरला बेदम मारहाण; ७,५०० रुपये लुटले, दोघांवर गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
  • तुळजापूर : टेलरिंगच्या दुकानात घुसून १० हजारांची खंडणी मागत टेलरला बेदम मारहाण; ७,५०० रुपये लुटले, दोघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!