• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

न्यायालयीन खटला मागे घेण्यावरून वृद्धासह पत्नीला कोयत्याने मारहाण; परंडा पोलिसांत ६ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
December 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
190
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : तालुक्यातील खासापुरी नं. २ येथे न्यायालयीन खटला मागे घेण्याच्या कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाला आणि त्यांच्या पत्नीला कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जखमी वृद्धाच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्रेश्वर किसन धनवे (वय ६५, रा. खासापुरी नं. २, ता. परंडा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली. आरोपींनी फिर्यादी उत्रेश्वर धनवे यांना गाठून “तू कोर्टातील केस काढून घेतोस की नाही,” अशी विचारणा करत वाद घातला. त्यानंतर, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी तसेच कोयत्याने मारहाण करून जखमी केले.

यावेळी फिर्यादीची पत्नी प्रभावती धनवे या भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आल्या असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

गुन्हा दाखल झालेले आरोपी:

या प्रकरणी खालील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

१. तुकाराम नामदेव धनवे २. चेतन उर्फ चैतन्या तुकाराम धनवे ३. इजूबाई नामदेव धनवे ४. शेषेराव विनायक धनवे ५. विलास विनायक धनवे ६. विलास नाना यादव (सर्व रा. खासापुरी नं. २, ता. परंडा)

पोलिस कारवाई:

उत्रेश्वर धनवे यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ११८(१), ११५(२), ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच आर्म ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Previous Post

विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; पीक विम्याच्या १२ हजार रद्द अर्जांची होणार फेरछाननी

Next Post

परंडा : पाचपिंपळा येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा : पाचपिंपळा येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group