उमरगा येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत ठेवीदारांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोसायटीच्या संचालकांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दिलीप शंकरराव सगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीचे उपाध्यक्ष चंदुलाल मोहनलाल, सचिव बालचंद्र लोढा, सहसचिव बद्रीनारायण बाहेती, कोषाध्यक्ष प्रल्हा अग्रवाल, संचालक विजय विठ्ठलराव लठ्ठा, अशोक जाजु, सतिष सारडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, प्रेमलता बाहेती, जगदीश बियाणी आणि मुख्य संचालक व्यंकटेश कुलकर्णी यांनी 13 ऑक्टोबर 2022 ते 29 जुलै 2024 या कालावधीत ठेवीदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केली. यामध्ये फिर्यादी दिलीप सगर यांच्यासह इतर ठेवीदारांची एकूण 25,86,968 रुपये आणि त्यावरील व्याज बुडवण्यात आले.
या प्रकरणी दिलीप सगर यांनी 19 ऑगस्ट 2024 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 316(5), 318(4) आणि 61(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.