धाराशिव येथे एमएस फिटनेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “धाराशिव (उस्मानाबाद) श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेला तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सरफराज कुरेशी यांनी “धाराशिव( उस्मानाबाद) श्री” किताब पटकावला, तर नवाज काडबे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आयोजन
तरुणांमध्ये सुदृढ शरीर व व्यायामाचे महत्त्व रुजविण्याच्या आणि त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. धाराशिव येथील अझहर पठाण आणि प्रवीण केसकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
पोलीस निरीक्षक शेख यांच्या हस्ते उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख, समाजसेवक मसुद शेख, इस्माईल शेख, गफार शेख, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ५० हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता.
विजेत्यांचा सन्मान
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून सोलापूर जिल्हा बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनचे सचिव प्रमोद काटे, जॉईंट सेक्रेटरी. नझिर शेख, .शकील बडेकर, धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष . संतोष कुलकर्णी, सचिव राहुल बचाटे यांनी काम पाहिले.
दरवर्षी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय
पहिल्याच वर्षी स्पर्धेला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजक अझहर पठाण आणि प्रवीण केसकर यांनी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील तरुण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.