• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ‘झिरो पोलीस’ची महिलेला भररस्त्यात अडवून छेडछाड

 ‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यानंतर अखेर गुन्हा दाखल!

admin by admin
June 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!
0
SHARES
520
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरात स्वतःला ‘झिरो पोलीस’ म्हणवून घेत पोलिसांच्या नावावर अरेरावी करणाऱ्या एका इसमाचा आणखी एक काळा कारनामा उघडकीस आला आहे. एका ३६ वर्षीय नोकरदार महिलेचा भररस्त्यात पाठलाग करून, तिचा हात धरून ओढाओढी करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. या गंभीर प्रकरणी सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना अखेर ‘धाराशिव लाईव्ह’ने दिलेल्या दणक्यानंतर जाग आली असून, आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदुपारी जिल्हा परिषदेजवळ घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३६ वर्षीय महिला ही एका खासगी नेत्रालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती कामाच्या निमित्ताने समर्थ नगर येथे गेली होती. तिथून आपले काम संपवून दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ती जिल्हा परिषदेच्या बाजूच्या रस्त्यावरून परत हॉस्पिटलकडे ड्युटीवर जात होती.

त्याच वेळी आरोपी  हा ‘झिरो पोलीस’ त्याच्या पल्सर मोटारसायकलवरून (क्र. MH 13 CL 8170) मागून आला. त्याने पीडित महिलेचा पाठलाग करत तिला भररस्त्यात अडवले. त्याने महिलेकडे तिचा मोबाईल नंबर मागितला. महिलेने “मी माझा नंबर तुला का देऊ?” असे विचारताच, आरोपीने “तु काय अप्सरा लागून गेली आहेस का?” असे म्हणत महिलेचा डावा हात धरून ओढाओढी करण्यास सुरुवात केली आणि विनयभंग केला.

भावाच्या मित्राला पाहून आरोपी पळाला

या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून तिथे तिच्या भावाचा एक ओळखीचा मित्र धावून आला. त्याला पाहताच आरोपी ‘झिरो पोलीस’ याने तिथून आपल्या मोटारसायकलवरून पळ काढला. यानंतर पीडित महिलेने तात्काळ आपल्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि मोटारसायकलचा नंबरही दिला.

‘झिरो पोलीस’ चा गुन्हेगारी इतिहास

संबंधित आरोपीहा शहरात ‘झिरो पोलीस’ म्हणून वावरत असून, पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आव आणून सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही आठवडे बाजारात पोलिसांच्या सांगण्यावरून व्यापाऱ्यांकडून लाच (हप्ता) गोळा केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर झालेला आहे. पोलिसांचे वरदहस्त असल्यानेच त्याचे मनोबल वाढले असून, त्याने आता भरदुपारी महिलेचा विनयभंग करण्याचे धाडस केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

‘धाराशिव लाईव्ह’चा दणका आणि पोलिसांची कारवाई

महिलेसोबत एवढा गंभीर प्रकार घडल्यानंतरही सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, ‘धाराशिव लाईव्ह’ने या प्रकरणाला वाचा फोडताच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. ‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यानंतर आनंदनगर पोलिसांनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ७५(१) (विनयभंग) आणि ७८(१) (पाठलाग करणे – Stalking) अंतर्गत गुन्हा (रजिस्टर क्र. ०२१५/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पीडितेच्या भावाने आरोपीला दिले पोलिसांच्या ताब्यात; तरीही FIR मध्ये ‘अनोळखी’? या घटनेनंतर पीडित महिलेच्या भावाने तात्काळ हालचाल करत आरोपी राम बोंदर याला पकडले आणि थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी पोलिसांच्याच ताब्यात होता आणि त्याचे नावही पोलिसांना स्पष्टपणे माहीत होते. असे असतानाही आनंदनगर पोलिसांनी एफआयआर (FIR) मध्ये आरोपीचे नाव न लिहिता त्याचा उल्लेख ‘अनोळखी इसम’ असा केला आहे. आरोपीचे नाव आणि तो पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याला एफआयआरमध्ये ‘अनोळखी’ दाखवल्यामुळे आता पोलिसांच्या एकूणच तपासावर आणि भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीला पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

Previous Post

परंड्यात घरात कोयते बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

धाराशिवमध्ये ‘झिरो पोलीस’ची महिलेला भररस्त्यात अडवून छेडछाड

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात घरात कोयते बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

June 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग परिसरात सोलर कंपनीची ८० हजारांची केबल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

June 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group