धाराशिव: धाराशिव शहरात दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडली आहे. तेरणा इंजिनिअरींग कॉलेजजवळ दोन अज्ञात इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली.
पृथ्वीराज सतिषराव माने (वय ३३, रा. रामकृष्ण कॉलनी, गवळीवाडा) हे त्यांच्या पत्नीसह मोटरसायकलवरून तुळजापूरहून धाराशिवकडे येत होते. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तेरणा इंजिनिअरींग कॉलेजजवळ विना नंबरच्या एफझेड मोटरसायकलवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने ओढून घेतली. साखळीची किंमत अंदाजे ६०,००० रुपये आहे.
याप्रकरणी पृथ्वीराज माने यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भादंवि कलम ३९४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.