येरमाळा – येरमाळा बसस्थानकावर एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. प्रियंका अजित शितोळे (वय ३२ वर्षे, रा. शेवाळेवाडी, हडपसर, पुणे) या २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता येरमाळा बसस्थानकावर बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेची चैन उघडून पर्समधील ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे १,६५,००० रुपये) चोरून नेले.
प्रियंका शितोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३७९(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
धाराशिव बसस्थानकावर वृद्ध महिलेच्या हातावरून सोन्याची पाटली चोरी
धाराशिव – धाराशिव बसस्थानकावर एका वृद्ध महिलेच्या हातावरून सोन्याची पाटली चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सरोजा प्रभाकर डांगे (वय ७० वर्षे, रा. गणेश नगर, धाराशिव) या १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत धाराशिव बसस्थानकावरून तुळजापूर-नाशिक बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या डाव्या हातातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली (किंमत ५०,००० रुपये) चोरून नेली.
सरोजा डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३७९(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.