कळंब: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे कळंब शहरातील एका सरकारी कर्मचाऱ्याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चांगलाच धडा शिकविण्यात आला. या घटनेत संबंधित कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळं फासून त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले भारत शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. ही पोस्ट पाहून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर शिंदे यांना पकडून त्यांना चोप दिला व तोंडाला काळं फासून सार्वजनिकरीत्या त्यांची नाचक्की करण्यात आली.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. मारहाणीनंतर, भारत शिंदे यांनी समाजाची माफी मागत आपला माफीनामा सादर केला.
या घटनेवर शहरातील विविध नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मराठा समाजाच्या काही नेत्यांनी सांगितले की, “जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीवर अशा आक्षेपार्ह टिप्पणी करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी समाजासाठी मोठा त्याग केला आहे, आणि त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही.”
व्हिडीओ पाहा