• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

धाराशिव जिल्ह्यातील ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश

admin by admin
May 12, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पूर्वीच्या काळात संवर्ग बदलून नियुक्त्या देण्याचा जो झपाटा सुरू होता, त्याला आता मोठी चाप बसली आहे. आरोग्य विभागाने नुकताच एक मोठा निर्णय घेत संवर्ग बदलून कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. याला आरोग्य विभागाच्या इतिहासामधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणून ओळखले जात आहे. या धडक कारवाईत धाराशिव जिल्ह्यातील ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

एकाच ठिकाणी आढळले एकाच स्पेशालिटीचे ८ MO

या कठोर निर्णयामागील कारणही तितकेच धक्कादायक आहे. माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या सचिवांच्या एका भेटीदरम्यान एकाच ठिकाणी एकाच स्पेशालिटीचे (speciality) तब्बल ९  वैद्यकीय अधिकारी (MO) कार्यरत असल्याचे आढळून आले. मंजूर आकृतीबंधानुसार रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध असणे आवश्यक असताना, अशा प्रकारे संवर्ग बदलून सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या मिळवल्याने अनेक रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

धाराशिवमधील ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश

शासनाने काढलेल्या आदेशानुसार आणि यादीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या ९ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. हे अधिकारी जिल्हा रुग्णालय धाराशिव, उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग, ग्रामीण रुग्णालय वाशी आणि ग्रामीण रुग्णालय तेर येथे कार्यरत होते.

गट-अ (एस-२३) संवर्गातील अधिकारी:

  • चंचला संभाजीराव बोडके (उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग)

  • गुरुबस नागनाथ बोटे (ग्रामीण रुग्णालय तेर)

  • संजय सुभाष सोनटक्के (जिल्हा रुग्णालय धाराशिव)

  • इस्माईल कासम मुल्ला (जिल्हा रुग्णालय धाराशिव)

  • मकद (मकरंद) परमेश्वर माने (जिल्हा रुग्णालय धाराशिव)

  • मौलजा (शैलजा) अनंतराव ठोंबरे (जिल्हा रुग्णालय धाराशिव)

  • डॉ. दयानंद बाबुराव कवडे (ग्रामीण रुग्णालय वाशी)

गट-अ (एस-२०) संवर्गातील अधिकारी:

  • डॉ. प्रशांत प्रकाश कोंडेकर (ग्रामीण रुग्णालय तेर)

  • डॉ. जगन्नाथ नरहरी कुलकर्णी (ग्रामीण रुग्णालय बैंबळी)

३० जूनपासून होणार कार्यमुक्त

शासनाच्या नवीन आदेशानुसार , संवर्ग बदलून (एस-२० व एस-२३ संवर्ग) कार्यरत असलेल्या या सर्व विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ३० जून २०२६ पासून सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. तसेच, जुलै २०२६ पासून त्यांचे वेतन संवर्ग बदलून असलेल्या पदावरून काढण्यात येणार नाही, अशी सक्त ताकीदही देण्यात आली आहे.

या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता त्यांच्या मूळ शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्या मूळ संवर्गात नवीन पदस्थापना दिली जाणार असून, त्याचे आदेश स्वतंत्रपणे काढले जातील असे शासनाने स्पष्ट केले आहे. ज्यांच्यावर न्यायालयाची स्थगिती आहे त्यांना वगळता, या आदेशामुळे राज्यभरातील शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

 

Previous Post

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना कळंबचा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; दुसरा फरार

Next Post

कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

Next Post
कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!