कळंब – कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी केतन अच्युत कुलकर्णी याने पत्नी अर्चना नरेंद्र तिवारी हिच्याशी कौटुंबिक वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, विट आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत अर्चना तिवारी गंभीर जखमी झाल्या आहेत.
आरोपी नामे-केतन अच्युत कुलकर्णी, रा. कथले चौक कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 22.30 वा. सु.कथले चौक कळंब येथे फिर्यादी नामे-अर्चना नरेंद्र तिवारी, वय 50 वर्षे, रा.कथले चौक कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अर्चना तिवारी यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 333, 352, 115(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडीत शेतातील रस्त्याच्या वादातून मारहाण
तामलवाडी – तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बिभीषण राजाराम गांधले, शामल बिभीषन गांधले आणि विजय बिभीषन गांधले या तिघांनी सुरेश बबन गांधले यांना शेतातील रस्त्यावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईप आणि लोखंडी चैनने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी नामे- बिभीषन राजाराम गांधले, शामल बिभीषन गाधंले, विजय बिभीषन गांधले, तिघे रा. जवळगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.05.10.2024 रोजी 12.30 वा. सु.खुंटेवाडी शिवारात फिर्यादी नामे-सुरेश बबन गांधले, वय 36 वर्षे, रा. जवळगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांना नमुद आरोपींनी शेतातील रस्त्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप व लोखंडी चैनने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश गांधले यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.