• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मनरेगा वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट द्या; आमदार कैलास पाटील यांची मागणी

मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन

admin by admin
June 30, 2026
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
मनरेगा वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट द्या; आमदार कैलास पाटील यांची मागणी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) पूर्ण झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान लाभार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त अट न लावता तातडीने अदा करावे, अशी जोरदार मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. यावर ग्रामविकास मंत्री भरत गोगावले यांनी मागणी मान्य करत संबंधित लाभार्थ्यांना विनाअट अनुदान देण्याचे आश्वासन दिले.

सभागृहात प्रश्न उपस्थित करताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, मनरेगा अंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, चौथ्या क्रमांकाचा अर्ज भरताना काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे किंवा यंत्रणेतील त्रुटींमुळे आवश्यक छायाचित्रे (फोटो) अपलोड होऊ शकली नाहीत. ही चूक लाभार्थ्यांची नसून संबंधित कर्मचारी व प्रशासनाची आहे.

आता काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फोटो अपलोड करण्याची अट घालणे व्यवहार्य नाही. त्यासाठी लाभार्थ्यांनी पुन्हा मजूर, यंत्रसामग्री आणि खर्च कसा करायचा, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही अट तत्काळ रद्द करून लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान अदा करावे, अशी त्यांनी मागणी केली.

यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडत सांगितले की, सध्या मनरेगा अंतर्गत रस्ते व सार्वजनिक स्वरूपाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सिंचन विहिरी, फळबाग, घरकुल यांसारख्या कामांचे पैसे रखडले आहेत. या योजनांतील लाभार्थ्यांनाही तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

 मंत्र्याकडून मागणी मान्य

उत्तर देताना ग्रामविकास मंत्री भरत गोगावले यांनी आमदार कैलास पाटील यांनी मांडलेली वस्तुस्थिती मान्य केली. वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान लाभार्थ्यांना विनाअट देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीही निधी उपलब्ध करून संबंधित अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करेल, असे आश्वासनही मंत्री गोगावले यांनी दिले.

 

Previous Post

‘मातोश्री’च्या तोफा, मल्लूची पाकिटे आणि ‘नागपूरकर सरदारांचा’ गेम!

Next Post

फेसबुक पिंट्याची ‘टक्केवारी’, लाडका कंत्राटदार ‘खंडोजी’ आणि विधानभवनात कैलास पर्वांचा करेक्ट कार्यक्रम!

Next Post
फेसबुक पिंट्याची ‘टक्केवारी’, लाडका कंत्राटदार ‘खंडोजी’ आणि विधानभवनात कैलास पर्वांचा करेक्ट कार्यक्रम!

फेसबुक पिंट्याची 'टक्केवारी', लाडका कंत्राटदार 'खंडोजी' आणि विधानभवनात कैलास पर्वांचा करेक्ट कार्यक्रम!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026

Recent Posts

  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!