• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काक्रंबा येथे तरुणाला सळई आणि बिअरच्या बाटलीने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: अण्णासाहेब पेट्रोल पंपासमोर एका ४१ वर्षीय व्यक्तीला दोघांनी पकडून ठेवत तिसऱ्याने सळई आणि बिअरच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना काक्रंबा (ता. तुळजापूर) येथे घडली. मंगळवारी (ता. १४ एप्रिल) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सदाशिव रावसाहेब क्षीरसागर (वय ४१, रा. अण्णासाहेब पेट्रोल पंपासमोर, काक्रंबा) हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपासमोर होते. यावेळी गावातीलच आरोपी स्वप्नील भास्कर सरक, विशाल शशिकांत खताळ आणि खंडू सुनील कोरके (सर्व रा. काक्रंबा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे तिथे आले.

काही समजायच्या आतच आरोपी स्वप्नील आणि विशाल यांनी सदाशिव यांना पकडून ठेवले. याचवेळी आरोपी खंडू याने त्याच्या हातातील सळईने सदाशिव यांच्या डोक्यात पाठीमागून वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्याने बिअरच्या बाटलीने त्यांच्या कपाळावर डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस मारून गंभीर दुखापत केली.

या मारहाणीनंतर सदाशिव क्षीरसागर यांनी मंगळवारी (ता. १४) दिलेल्या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात आरोपी स्वप्नील सरक, विशाल खताळ आणि खंडू कोरके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.

Previous Post

कदेर येथे दुधाचा कॅन मारून एकास बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

सिंदफळमध्ये जमिनीच्या वादातून महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सिंदफळमध्ये जमिनीच्या वादातून महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!