तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथे बैलाच्या पैशांवरून झालेल्या वादातून भरत माने (26 वर्षे) यांना तिघांनी मारहाण केल्याची घटना 4 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अंकुश बळीराम देवकर, तानाजी बळीराम देवकर आणि बळीराम शेषेराव देवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भरत माने यांना विकलेल्या बैलाचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, मारहाण करण्यासाठी लोखंडी गज वापरल्याने माने जखमी झाले. वाद सोडवण्यासाठी आलेल्या माने यांच्या आईलाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली.
या घटनेनंतर भरत माने यांनी 5 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भादंवि कलम 118 (1), 115(2), 352, 324, (4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.