वाशी – वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी सरमकुंडी फाटा व पारडी फाटा येथे बेकायदेशीरपणे म्हशींची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. अजीत अब्दुला पठाण (20 वर्षे) आणि सफीन सौदागर ईकरार (22 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी आयशर टेम्पो (क्र. एमएच 24 एयु 2926) आणि पिकअप (क्र. एमएच 25 ए.जे. 5309) या दोन वाहनांमध्ये म्हशी भरून कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. जनावरांची सुरक्षितता धोक्यात घालून त्यांना दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने वागवले जात होते.
पोलिसांनी 10,95,000 रुपये किमतीच्या म्हशी आणि वाहने जप्त केली असून आरोपींविरुद्ध प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा आणि प्राण्यांचा परिवाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.