शिराढोण : मयत नामे-उत्तम श्रीरंग नरसिंगे, वय 52 वर्षे, रा. जायफळ ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 20.03.2024 रोजी रात्री 07.00 वा. सु. ते दि. 21.03.2024 रोजी 09.00 वा. सु. जायफळ ते शिराढोण जाणारे रोडवर जायफळ शिवारात केवठबाई नरसिंगे यांचे शेताचे जवळुन मोटरसायकवरुन जात होते. दरम्यान आरोपी नामे- संदीप मढके (गुत्तेदार) व इतर इसम यांनी जायफळ शिराढोण जाणारे रोडवर केवठबाई नरसिंगे यांचे शेता जवळ रस्त्याचे पुलाचे कामामुळे खोदलेल्या खड्ड्या भोवती काही एक न लावता तसेच सुचना फलक न लावता हलगर्जी व निष्काळजीपणा केल्या मुळे उत्तम नरसिंगे हे खोदलेल्या खड्ड्यात पडून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमर उत्तम नरसिंगे, वय 24 वर्षे, रा. जायफळ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-304, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
येरमाळा : मयत नामे- आकाश सुभाष अरुणे, वय 30 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे दि.22.03.2024 रोजी 20.30 वा. सु. मोटारसायकल क्र एमएच 25 एआर 8733 वरुन समर्थ पेट्रोल पंप बाजूला तेरखेडा ता. वाशी येथुन जात होते दरम्यान ट्र क्र एपी 07 टी.जी. 5346 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे चालवून आकाश अरुणे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात आकाश अरुणे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद ट्रक चालक हा अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रविण सुभाष अरुणे, वय 31 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
परंडा :आरोपी नामे-1)सार्थक भवर, 2) ओम अंधारे, 3) गणेश सरवदे, 4) संकेत अंधारे, 5) सोहम वीर सर्व रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी 19.30 ते 20.00 वा. सु. मानकेश्वर ते मानकेश्वर फाटा रोडवर फिर्यादी नामे- शिवाराज बाळासाहेब औताडे, वय 19 वर्षे, रा. वांगी ता. भुम जि. धाराशिव यांना व नमुद आरोपींनी तु रास्ता रोको च्या दिवशी आमचे गाड्या तुझ्या शेतात का जावू दिल्या नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, वायर व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवराज औताडे यांनी दि.23.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 324,323, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.