शिराढोण : आरोपी नामे-नामदेव मारुती माळकर, गोविंद मारुती माळकर, अशोक हनुमंत माळकर, लहु जनक माळकर, अजित गुणवंत माळकर, नवनाथ ज्ञानोबा माळकर, राजाभाउ निवृत्ती माळकर, बाळासाहेब बाबुराव माळकर, नवनाथ लिंबाजी मगर, करण गोविंद माळकर, ज्ञानेश्वर नामदेव माळकर, घनशाम राजाभाउ माळकर, अंकुश राजाभाउ माळकर,कृष्णा रतन माळकर, वैभव नवनाथ माळकर, राहुल हरीभाउ माळकर, भिमराव जनक माळकर, सर्व रा. हिंगणगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 10.06.2024 रोजी 08.30 वा. सु. हिंगणगाव येथे फिर्यादी नामे- संतोष रामभाउ कसपटे, वय 46 वर्षे, र. हिंगणगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा शिवतेज कसपटे, व धीरज बळीराम कसपटे यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच शिवतेज कसपटे यांच्या खिशातील मोबाईल फोन काढून घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष कसपटे यांनी दि.27.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 324, 323, 327, 452, 143, 147, 148, 149, 504, 506 सह कलम 135 म.पे.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण: आरोपी नामे-शिवतेज संतोष कसपटे, ऋषीकेश महादेव कसपटे, करण सोमनाथ कसपटे, सुशांत काशीनाथ कसपटे, विराज बळीराम कसपटे, प्रशांत रामभाउ कसपटे, बळीराम मल्हारी कसपटे, महादेव मल्हारी कसपटे, लक्ष्मण हरीभाउ कसपटे, संतोष रामभाउ कसपटे, विक्रम लक्ष्मण कसपटे,महादेव गुणवंत घुले, ओंकार आगरचंद हातमोटे, धोंडोपंत अंकुश घुले शुभम महारुद्र गवळी सर्व रा. हिंगणगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 10.06.2024 रोजी 08.30 वा. सु. हिंगणगाव येथे फिर्यादी नामे-कृष्णा रामरतन माळकर, वय 35 वर्षे, रा. कोथळा ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. हिंगणगाव पाटी ता. कळंब जि. धाराशिव यांना व नामदेव माळकर, अशोक माहकर, हनुमंत माळकर, गोविंद माळकर, बाळासाहेब माळकर यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कृष्णा माळकर यांनी दि.27.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 148, 149,326, 324, 323, 504, 506 सह कलम 135 म.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शेतीच्या वादावरून लाथाबुक्यांनी मारहाण
आंबी : आरोपी नामे-बाळु अर्जुन चव्हाण, अजिंक्य बाळासाहेब चव्हाण, रा. डोंजा ता. परंडा ह.मु. पिंपरी चिंचवड पुणे, बाळु पवार, रा. फिसरे ता. करमाळा जि. सोलापूर, मगन धोंडीबा सोनवणे, सुरज मगन सोनवणे दोघे रा. मिरगव्हाण ता. करमाळा जि. सोलापूर यांनी दि. 25.06.2024 रोजी 14.30 वा. सु. डोंजा शिवारातील शेतात फिर्यादी नामे-सचिन महादेव चव्हाण, वय 34 वर्षे, रा. डोंजा ता. परंडा जि. धाराशिव यांना त्यांचा भाउ उमेश चव्हाण यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉड व काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सचिन चव्हाण यांनी दि.27.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बाथरुमच्या पाण्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ
नळदुर्ग : आरोपी नामे-नागेश सरडकर, महेश सरडकर दोघे रा. आरळी (बु) ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 21.06.2024 रोजी 08.00 वा. सु. व दि. 24.06.2024 रोजी 14.30 वा. सु. आरळी (बु) येथे फिर्यादी नामे- शिवाजी तुळशीराम माळी, वय 50 वर्षे, रा. आरळी(बु) ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. पुजारी नगर तुळजापूर जि. धाराशिव यांचे आईस नमुद आरोपींनी बाथरुमच्या पाण्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी हे नमुद आरोपींना समजावून सांगण्यास गेले असता त्यांनाही नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी माळी यांनी दि.27.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 504, 506, 34 सह कलम 3(1)(आर),3(1)(एस),3(2)(व्हीए) अ.जा.ज.अ.प्र. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.