• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, November 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब: मोहा येथील स्मशानभूमीचा वाद चिघळला; ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला, ६० पेक्षा जास्त जणांवर दुसरा गुन्हा दाखल

admin by admin
August 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
695
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब: तालुक्यातील मोहा येथील स्मशानभूमीच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर आता त्याच घटनेत गावातील ७ जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी एका ग्रामस्थाने दिलेल्या तक्रारीवरून, २ डझनांहून अधिक नामनिर्देशित आणि इतर ३८ अशा एकूण ६० पेक्षा जास्त जणांच्या जमावावर खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ मंचक मडके (वय ४०, रा. मोहा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजता मोहा शिवारातील गट क्रमांक ५२९ मधील स्मशानभूमीच्या जागेच्या कारणावरून हा हल्ला झाला. फिर्यादीनुसार, रमेश काळे, शहाजी काळे, प्रकाश काळे यांच्यासह ६० पेक्षा जास्त जणांच्या जमावाने बेकायदेशीर मंडळी जमवली. त्यांनी नवनाथ मडके यांच्यासह राकेश मडके, पांडुरंग मडके, लक्ष्मण मडके, भिमराव मडके, अंगद मडके आणि श्रीराम मडके यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण केली. यात हे सर्वजण गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला झाला, त्याचवेळी जागेची हद्द निश्चिती करण्यासाठी आलेल्या महसूल आणि पोलीस पथकावरही याच जमावाने दगडफेक केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा आधीच दाखल केला आहे. आता ग्रामस्थांच्या तक्रारीवरून हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

नवनाथ मडके यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी जमावावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

कळंब: स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून पोलिसांवरच हल्ला; जमावाची दगडफेक, ४ पोलीस जखमी

Next Post

कळंब: “दारू प्यायला पैसे दे, नाहीतर…”, ४५ वर्षीय व्यक्तीचा गमजाने गळा आवळून खुनाचा प्रयत्न; १० हजारही लुटले

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कळंब: "दारू प्यायला पैसे दे, नाहीतर...", ४५ वर्षीय व्यक्तीचा गमजाने गळा आवळून खुनाचा प्रयत्न; १० हजारही लुटले

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

रक्षकच बनले भक्षक!

November 13, 2025
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव: बदली होऊनही १४ पोलीस अंमलदार जुन्याच जागी

November 13, 2025
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर: महिलेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी; धाराशिव न्यायालयाचा निकाल

November 12, 2025
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

प्रेमसंबंधातून महिलेला पेटवल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा

November 12, 2025
विद्याचरण कडावकर धाराशिवचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

विद्याचरण कडावकर धाराशिवचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

November 12, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group