• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंबजवळ मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू, दोन जखमी

admin by admin
March 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –  कळंबजवळील हावरगाव रस्त्यावर मोटारसायकलच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. राहुल तानाजी पवार (वय 27, रा. रमाई नगर, धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राहुल पवार, सचिन राजेंद्र पवार आणि सुरज संजय काळे हे तिघे जण एमएच 44 एम 0917 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कळंबहून हावरगावकडे जात होते. कळंब शिवारातील बब्रुवान काळे यांच्या घरासमोर वळणावर राहुलने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सचिन आणि सूरज या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि गुन्हा दाखल केला. राहुलची आई अनिता तानाजी पवार यांनी या अपघाताबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, कळंब पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125 (ए), 125(बी) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

Previous Post

भूममध्ये अवैध जनावरांचे वाहतूक करणारे पकडल्याच्या कारणावरून मारहाण

Next Post

परीक्षा केंद्रावर विषय शिक्षकांची नियुक्ती प्रकरण: चौकशीसाठी अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले

Next Post
परीक्षा केंद्रावर विषय शिक्षकांची नियुक्ती प्रकरण: चौकशीसाठी अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले

परीक्षा केंद्रावर विषय शिक्षकांची नियुक्ती प्रकरण: चौकशीसाठी अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले

ताज्या बातम्या

पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

वडगाव सि. : जिल्हा परिषद शाळेतून दोन १५ वर्षीय शाळकरी मुलांचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून लॉज मालक व मॅनेजरची गुंडगिरी; गुलबर्गा येथील पर्यटकावर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला

October 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाघोली : बौद्धिक दिव्यांग दांपत्याला लोखंडी पट्टीने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण

October 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माडज : मोटारसायकल नेल्याच्या कारणावरून महिलांना काठी व बेल्टने बेदम मारहाण

October 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : मंदिरासमोर तेलंगणातील भाविकाची ९० हजारांची सोन्याची चैन लांबवली

October 26, 2026

Recent Posts

  • वडगाव सि. : जिल्हा परिषद शाळेतून दोन १५ वर्षीय शाळकरी मुलांचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून लॉज मालक व मॅनेजरची गुंडगिरी; गुलबर्गा येथील पर्यटकावर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला
  • वाघोली : बौद्धिक दिव्यांग दांपत्याला लोखंडी पट्टीने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण
  • माडज : मोटारसायकल नेल्याच्या कारणावरून महिलांना काठी व बेल्टने बेदम मारहाण
  • तुळजापूर : मंदिरासमोर तेलंगणातील भाविकाची ९० हजारांची सोन्याची चैन लांबवली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!