कळंब – कळंब पोलिसांनी हिमालय बार आणि लॉज येथे छापा टाकून चार महिलांची सुटका केली असून, वेश्या व्यवसायासाठी महिलांना जबरदस्तीने प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय परशुराम कदम (वय 47, रा. शिक्षक कॉलनी, कळंब), प्रशांत विठ्ठल काळे (वय 44, रा. मंगरूळ, ता. कळंब), आणि सलाउद्दीन दगडू शेख (वय 38, रा. चोंदे गल्ली, कळंब) यांनी संगणमत करून आर्थिक फायद्यासाठी महिलांना वाणिज्यिक हेतूने आश्रय दिला. तसेच, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना लैंगिक शोषणासाठी प्रवृत्त करून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता छापा टाकला आणि पीडित महिलांची सुटका केली. सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 144 तसेच अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.