कळंब : फिर्यादी नामे- विजय भारत वाघमारे, वय 24 वर्षे, रा. व्यवसाय खाजगी नोकरी, राजश्री सर्व्हिसेस पेट्रोलपंप हासेगाव के रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव येथे ऑफीसमध्ये असताना अज्ञात चार इसमांनी दि. 28.01.2024 रोंजी 23.45 वा. सु. राजश्री सर्व्हिसेस पेट्रोलपंप हासेगाव के रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव ऑफीसमध्ये घुसून सत्तुर व चाकुचा धाक दाखवून पेट्रोल व डिझेल विकुन जमा झालेले ऑफीस काउंटरमध्ये ठेवलेले एकुण 3,28,808 ₹ रोख रक्कम जबरीने लुटून पसार झाले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजय वाघमारे यांनी दि.29.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-अर्जुन रामभाउ खोसे, वय 57 वर्षे, रा. विजारा ता. वाशी जि. धाराशिव यांचे विजोरा शिवारातील शेतातील राहात्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 29.1.2024 रोजी 13.00 ते 15.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 25 भार चांदीचे दागिने व रोख रक्कम 10,000₹ असा एकुण 48,750 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अर्जुन खोसे यांनी दि.29.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 380, 454 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.