कळंब : पिठामध्ये विष मिसळून ते जनावरांना खावू घातल्याने दोन म्हैशी आणि एक गाय मृत्युमुखी पडली. याप्रकरणी एकावर कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादी नामे- कृष्णा रामलिंग माळी, वय 31 वर्षे, रा. दत्त नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे कळंब शिवारातील कल्याण देशमुख यांचे शेतात बांधावर संशईत आरोपी नामे- सुदर्शन श्रीरंग कोळपे, वय 40 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांने फिर्यादी यांचे जनावरे चरण्यासाठी जातात या ठिकाणी पिठामध्ये विष मिसळून ठेवून ते जनावरांना खावून विषबाध व्हावी या उद्देशाने ठेवले होते. तसेच सदरचे विषमिश्रीत पीठ खावून फिर्यादी यांचे 1 मुरा म्हैस , 1 पंढरपुरी जातीची म्हैस , व एक गावराण गाय असे एकुण 2,00,000₹ किंमतीचे जनावराचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कृष्णा माळी यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 429 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
खेकडा म्हटल्याने मारहाण
वाशी : आरोपी नामे-विनोद वसंत केळे, रा. केळेवाडी, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 20.05.2024 रोजी 12.00 वा. सु. केळेवाडी येथे फिर्यादी नामे- रेष्मा विठ्ठल केळे रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव, व त्यांचा मुलगा नामे- बाजीराव विठ्ठल केळे यांना नमुद आरोपींनी खेकड्या का मनलात हा राग मनात धरुन शिवीगाळ करुन फिर्यादीचे मुलास उचलुन खाली फेकुन देवून डेाके भिंतीवर आपटुन लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेष्मा केळे यांनी दि.23.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.