• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काटीत झाडाच्या फांद्या तोडण्याच्या वादातून ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण

दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
202
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीला दोघा भावांनी शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अविनाश श्रीधर आंबेकर आणि आदेश श्रीधर आंबेकर (दोघे रा. काटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चंद्रकांत कचरू क्षिरसागर (वय ५२, रा. काटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १० मे २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास काटी गावात घडली. चंद्रकांत हे चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना, आरोपी अविनाश आंबेकर आणि आदेश आंबेकर यांनी त्यांना अडवले. ‘झाडाच्या फांद्या का तोडतो’ असे म्हणत आरोपींनी चंद्रकांत यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर चंद्रकांत क्षिरसागर यांनी ११ मे २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाश आंबेकर आणि आदेश आंबेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

Previous Post

कडकनाथवाडीत विचारणा करणाऱ्या तरुणाला मारहाण, हाताला चावा; येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

परंड्यात शेतीच्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, वडीलही जखमी

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

परंड्यात शेतीच्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, वडीलही जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group