• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कौडगाव बावीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाखरवाडीच्या समाज मंदिरातच जुगाराचा अड्डा; ढोकी पोलिसांच्या छाप्यात नऊ जण ताब्यात
0
SHARES
437
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौडगाव बावी येथे शेतात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह मोबाईल, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४७ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, १३ जणांविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौडगाव बावी शिवारात मंगेश बबन कदम याच्या शेतातील पत्र्याच्या शेडसमोरील मोकळ्या जागेत काही जण पैशांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती ढोकी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी १८.३० वाजताच्या सुमारास या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी तेथे मोठा जुगार अड्डा सुरू असल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून मंगेश बबन कदम (३१, रा. कौडगाव बावी), शरद श्रीमंत जाधव (३५, रा. जवळे दु.), विशाल सोमनाथ पवार (२९), रणजित काका पवार (२५), अर्जुन भिमा पवार (१९, तिघे रा. तेर), बालाजी प्रभाकर नवले (३९), किरण कैलास पडवळ (३८, दोघे रा. उपळा मा.), बलभिम जगन्नाथ जाधव (४४, रा. धाराशिव), संदिप दामोदर काकडे (४४, रा. बार्शी नाका), धर्मराज प्रल्हाद आदमिले (५०, रा. जवळे दु.), शकील फरीद तांबोळी (४८), नरसिंह तिलास हाजगुडे (४४) आणि इरफान हमीद पठाण (४४, तिघे रा. ढोकी, जि. धाराशिव) अशा एकूण १३ जणांना रंगेहाथ पकडले.

या जुगारी लोकांकडून पोलिसांनी तिरट मटक्याचे साहित्य, १२ मोबाईल फोन, ६ मोटारसायकली आणि रोख रक्कम असा तब्बल ५ लाख ४७ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


Previous Post

तुळजापूर : नार्कोटिक्स ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचीच संशयास्पद भूमिका! पुरावे असूनही आरोपींना केले साक्षीदार

Next Post

इंदापूर शिवारात भरदिवसा महिलेला लुटले; दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांचा प्रताप, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

इंदापूर शिवारात भरदिवसा महिलेला लुटले; दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांचा प्रताप, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

June 19, 2026
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

June 18, 2026
ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

June 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’! उमरगा, नळदुर्ग अन् येरमाळ्यात तलवारी आणि कोयत्यासह तिघे गजाआड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

June 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group