मुरुम : फिर्यादी नामे-संगिता विजय राठोड, वय 40 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- विशाल विजय राठोड, वय 15 वर्षे रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.19.02.2024 रोजी 10.00 वा. सु. आष्टाकासार येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संगिता राठोड यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
वाशी : आरोपी नामे- दिपक शहाजी सूरवसे, वय 40 वर्षे, रा. बोरी ता. वाशी जि. धाराशिव, 2) रामा झिंगा काळे, वय 45 वर्षे, रा. तेरखेडा लक्ष्मी पारधी पिढी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 23.11.2023 रोजी 10.00 वा. सु बोरी येथे फिर्यादी नामे- शुभम संदिपान लोंढे, वय 25 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव ह.मु. बोरी ता. वाशी जि. धाराशिव यांचा मेव्हुणा दिपक सुरवसे हा ट्रॅक्टर व ट्रॉली घेवून गेला. परंतु आरोपी नामे- रामा काळे यांचा व दिपक सुरवसे यांच्यातील झालेल्या व्यवहारापोटी रामा काळे यांनी बेकायदेशीरपणे फिर्यादीच्या मालकीचा ट्रॅक्टर व ट्रॅाली स्वताकडे तिन महिण्यासाठी ठेवून शुभम लोंढे यांची एकुण 45,000 ₹ चे आर्थिक नुकसान करुन विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फौजदारी अर्ज क्र 05/2024 जावक क्र 439/2023 दि. 13.02.2024 फौ. प्र. संहिता कलम 156(3) अन्वये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय वाशी यांचे कडून प्राप्त झाले वरुन फिर्यादी नामे- शुभम लोंढे, यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 406, 420, 427, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
नळदुर्ग : फिर्यादी नामे-व्यंकट प्रल्हाद पुजारी, वय 64 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि 04.02.2024 रोजी 12.30 ते दि. 18.02.2024 रोजी 20.30 वा.पावेतो राहाते घराला कुलूप लावून लातुर येथे हॉस्पीटलचे कामानिमीत्त गेले असता अज्ञात व्यक्तीने व्यंकट पुजारी यांचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व एक एलईडी असा एकुण 73,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- व्यंकट पुजारी यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.