लोहारा – लोहारा तालुक्यातील खेड शिवारात आज सकाळी 8:30 ते 8:45 च्या सुमारास बसवकल्याण-तुळजापूर एसटी बसला अचानक आग लागली. बसमध्ये विद्यार्थी आणि प्रवासांसह एकूण 65 लोक होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
बस क्रमांक एम एच 20 बी एल 2092 ही बस बसवकल्याणहून तुळजापूरकडे जात होती. खेड शिवारातील लोकमंगल कारखान्याजवळ प्रवाशांना उतरवण्यासाठी बस थांबली. त्याचवेळी बसच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली.
बसचे चालक एम. व्ही. घंटे आणि वाहक बी. एस. गोरे यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना तातडीने बसमधून बाहेर काढले. बसला आग लागल्याचे पाहून लोकमंगल कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली.
या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे आणि पोलीस कर्मचारी कांतु राठोड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. प्रवाशांना बस स्टॉपवर उतरवण्यासाठी थांबल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Video