लोहारा: लोहारा शहरातील आक्सा पार्क परिसरात राहणाऱ्या वैभव गोविंदराव जाधव यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 च्या दरम्यान ही घटना घडली.
चोरट्यांनी जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 83 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 28 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी वैभव जाधव यांनी 31 जानेवारी रोजी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 331(3) आणि 454 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
शेतातून म्हैस चोरी, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
धाराशिव :- शिंगोली येथील श्रीकांत बाळासाहेब क्षिरसागर यांच्या शेतातील वीस हजार रुपये किमतीची काळी म्हैस अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे. 26 जानेवारीच्या रात्री 11:40 ते 27 जानेवारी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. श्रीकांत क्षिरसागर यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिरयाद दिली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.