लोहारा : तुला कारकुनाचे काम येत नाही, पन्नास हजार रुपये घेवुन आला तरच हजेरी पटावर स्वाक्षरी घेण्यात येईल असे म्हणून जाणून बुजून मानसिक त्रास दिल्याने माकणी येथील भारत शिक्षण संस्था संचलित भारत विद्यालयातील एका क्लार्कने पळसाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी संस्थेचे संचालक, दोन मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत नामे- लिंबराज बाबुराव मुळे, ( वय 42 वर्षे, रा. नारंगवाडी, ता. उमरगा ) यांनी दि.27.10.2023 रोजी 12.52 वा. पुर्वी पेठसांगावी शिवारातील रोहन बालाजी शिंदे यांचे शेत गट नं 78/03 मध्ये पळसाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.मयत लिंबराज मुळे हे भारत शिक्षण संस्था संचलित भारत विद्यालय माकणी येथे मागील एक वर्षापासून क्लार्क म्हाणून कार्यरत होते.
आरोपी नामे- 1) भारत शिक्षण संस्थेचे संचालक- शेषेराव नृसिंह पवार, 2)जयराम विद्यालय नारंगवाडी येथील मुख्याध्यापक- अजय शेषेराव पवार, दोघे रा. नारंगवाडी, ता. उमरगा 3) भारत विद्यालय माकणी येथील मुख्याध्यापक-राम महादेव जाधव,रा. एकुरगा ता. उमरगा यांनी तुम्हाला कारकुनाचे कामकाज येत नाही तुम्ही पन्नास हजार रुपये घेवुन या तरच हजेरी पटावर स्वाक्षरी घेण्यात येईल असे म्हणून जाणून बुजून मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून लिंबराज मुळे यांनी आत्महत्या केली .
याबाबतची फिर्याद मयताचा चुलत भाउ यशवंत वसंतराव मुळे, वय 35 वर्षे, रा. उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 384, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.