धाराशिव – छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये एका शंभूभक्तास मारहाण करुन गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपीना लुटीच्या मालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने आवश्यक त्या साहित्यासह पेट्रोलींग कामी रवाना होवून साठे चौक धाराशिव येथे आले असता पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे प्रेम उर्फ दादया अमर चव्हाण रा. तुळजापूर नाका धाराशिव व त्याचा साथीदार यांनी मिळून सहयाद्री हॉस्पीटल जवळील छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये एका इसमास मारहाण करुन गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावून पळून गेले होते व सध्या ते गावसुद रोड तुळजापूर नाका येथे थांबलेला आहे.
सदर ठिकाणी पोलीस पथक गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे एक इसम मिळून आला. पथकाने सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव – प्रेम उर्फ दाद्या अमर चव्हाण, वय 19 वर्षे, रा. तुळजापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव असे सांगीतल्याने पथकाने नमुद आरोपीकडे गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता त्याने सुरवातील उडवा उडवीचे उत्तरे दिली.
त्यांनतर पथकाने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांने सांगिंतले की, मी वा माझा मित्र रोहन कबीर गायकवाड रा. इंदीरानगर धाराशिव असे मिळून संभाजी महाराज जयंती मिरवणुकमध्ये एका इसमास मारहाण करुन गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावून घेवून चोरी केलेली होती असे सागिंतल्यावरून पथकाने रोहन गायकवाड याचा ठावठिकाणा बाबत विचारपूस करता तो सांजा रोड ब्रिज खाली थांबलेला आहे असे सागिंतल्याने पथकाने रोहन गायकवाड यास ताब्यात घेवून नमुद दोन आरोपी यांचे कडून अंदाजे 1,05,000₹ किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केली. तसेच आरोपी नामे- रोहन कबीर गायकवाड, वय 20 वर्षे, रा. पोहनेर ता. जि. धाराशिव ह.मु. इंदिरानगर धाराशिव यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांने सांगिंतले की, संभाजी महाराज जयंती मध्ये एक इसमाचे खिश्यातील एक ॲपल आयफोन 15 प्लस मोबाईल चोरी केला आहे यावरुन पथकाने त्याच्या ताब्यातुन अंदाजे 65,000₹ किंमतीचा ॲपल आयफोन 15 प्लस जप्त करुन पुढील कार्यवाही कामी दोन्ही आरोपींना आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.
तलवार सह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सुरज उर्फ गुद्या दिलीप इंगळे रा. गावसुद रोड तुळजापूर नाका धाराशिव याच्या राहत्या घरामध्ये त्याच्या ताब्यात बेकायदेशीर रित्या एक लोखंडी तलवार बाळगुन आहे.अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने दि. 27.05.2024 रोजी 17.30 वा. सु. सदर ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे एक इसम मिळून आला. पथकाने सदर इसमास त्याने त्याचे नाव- सुरज उर्फ गुद्या दिलीप इंगळे वय 20 वर्षे, रा. गावसुद रोड तुळजापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव असे सांगीतले. याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात लोखंडी तलवार एकुण अंदाजे 1,500 ₹ किंमतीची मिळुन आली. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद लोखंडी तलवार जप्त करुन त्याच्याविरुध्द धाराशिव शहर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 239/2024 हा शस्त्र कायदा कलम- 4/25 सह मपोका कलम 37(1) (3) अन्वये नोंदवण्यात आला आहे.