• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूर येथे शेत जमिनीच्या वादातून मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
September 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शेत जमिनीच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश उद्धव घुगे (वय ४०) हे दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  त्यांच्या आईसह अणदूर शिवारातील गट नं. ३५/१/१  येथे गेले होते. या जमिनीवरून त्यांचे चुलते आणि आरोपी प्रदीप घुगे यांचा भाऊ यांच्यात न्यायालयात दावा प्रलंबित आहे.

शेतात काम करत असताना आरोपी प्रदीप शिवाजी घुगे आणि सुरेखा नंदू राठोड यांनी फिर्यादीचे चुलत भाऊ अभिषेक उत्तम घुगे आणि चुलती छाया उत्तम घुगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी महेश आणि त्यांच्या आईने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली असता, आरोपी प्रदीप घुगे याने “हे शेत माझ्या भावाच्या मालकीचे आहे” असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली.

यानंतर आरोपी प्रदीप घुगे याने शेतातील दगड उचलून फिर्यादी महेश यांच्या उजव्या हातावर आणि चुलत भाऊ अभिषेक याच्या हातावर व पाठीत मारून त्यांना जखमी केले. या भांडणात फिर्यादीच्या चुलतीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तुटून कुठेतरी पडून गहाळ झाले.

घटनेनंतर जखमींना नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महेश घुगे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून  नळदुर्ग पोलिसांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून ४७ मिनिटांनी आरोपी प्रदीप शिवाजी घुगे व सुरेखा नंदू राठोड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंद शिवाजी कांगुणे करत आहेत. 

Previous Post

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण १० : योद्ध्याचा एल्गार आणि सिंहासनाची चलबिचल…

Next Post

दुचाकी आणि मालाची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

Next Post
दुचाकी आणि मालाची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

दुचाकी आणि मालाची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!