जालना: मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी आपले उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. जरांगे पाटलांनी सांगितले की, सलाईन लावून उपोषण करण्यात अर्थ नाही, त्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित केले आहे.
जरांगे पाटलांनी म्हटले की, “सलाईन घेऊन शरीराला काही होत नाही, असे आंदोलन करण्यात काही अर्थ नाही. शंभूराज देसाई यांनी दोन महिन्यांचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत.” त्यांनी गावातील महिलांकडून पाणी पिऊन उपोषण सोडण्याचे जाहीर केले.
जरांगे पाटलांनी पुढे सांगितले की, “सरकारच्या खुर्चीसाठी तयारी करावी लागेल. मी इथे झोपून कशाला वेळ घालवू. मला राज्यात फिरण्याची, सभा, रॅली घेण्याची गरज आहे.”
मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करत म्हटले की, “कोणतेही मंत्री आले नाहीत, कारण त्यांना वाटते की कोणत्या तोंडाने यावे. सलाईन लावून उपोषण होत नसते.” त्यांनी स्पष्ट केले की, “सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही.”
कोटाने १२ वर्षांपूर्वीच्या गुन्हयाबाबत पाठ्वलेल्या समन्सबद्दल जरांगे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केला की, “उद्धव ठाकरे यांचा या प्रकरणात हात असू शकतो.” त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आणि न्यायाधीशांना त्यांच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित केले.
मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी सांगितले की, “मी घर विकून पैसे देतो, मी गायरानात राहील.” त्यांनी त्यांच्या उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या धारेला परत आणण्याचा इशारा दिला आहे.