• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु

मराठा आरक्षण : वडगाव (सि.) मध्ये कॅन्डल मार्च

admin by admin
November 1, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे व मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनिषा राखुंडे व शिलावती देशमुख यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षण योध्दा श्री. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (दि.२४) अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषण सुरू केले आहे.शासनाने आजतागायत या उपोषणाची दखल घेतलेली नाही.त्यामुळे श्री. जरांगे यांना समर्थन देण्यासाठी व सकल मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

आंदोलकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदारांच्या यांच्या प्रतिमेचा जाळल्या

धाराशिव  – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर सरकारने सातत्याने हे आरक्षण देण्यासाठी मुदत वाढ हे धोरण अवलंबले आहे. तसेच आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या आरक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी समर्थन देणाऱ्या आमदार कैलास पाटील यांच्यासह इतर आमदारांना अटक केली आहे. त्यामुळे या सरकारच्या कृतीचा मराठा आंदोलकांनी जाहीर निषेध केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रतिमांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट आग लावून जाळून या सरकारचा व सर्वपक्षीय बैठकीतील नेते मंडळींसह सर्व आमदारांचा जाहीर निषेध केला.

संकेत सुर्यवंशी, अभिजीत देशमुख, धर्मा सुर्यवंशी, निलेश साळुंके, धैर्यशील सस्ते, बंडू आदरकर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, अण्णा यादव, वैभवी आकाश मुगळे, पंकज पाटील, अमोल शिरसाट आदींसह इतर मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

मराठा आरक्षण : वडगाव (सि.) मध्ये कॅन्डल मार्च

वडगाव (सि.) – मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे – पाटील यांचे अमरण उपोषण आठव्या दिवशीही सुरुच आहे. शासन मराठा आरक्षण देण्यास वेळकाढू पणा करीत आहे. शासनास साडी,चोळी, बांगड्या पाठवून शासनाच्या या कृतीचा वडगाव (सि.) येथे मराठा आंदोलकाच्या वतीने निषेध करण्यात आला. मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे – पाटील यांचे अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील वडगाव (सि.) येथे साखळी उपोषण सुरु आहे.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, सरसकट मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील हे अंतरवली, सराटी येथे २५ ऑक्टोबर पासून अमरण उपोषणास बसले आहेत. सरकार मराठा आरक्षण देण्यास वेळकाढू पणा करीत आहे. मनोज जरांगे – पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सरकारच्या वेळकाढूचा निषेध करण्यासाठी आंदोलकाच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठ्याकडे साडी, चोळी, बांगड्या देवून शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी आंदोलकाच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मरोज जरांगे – पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे.तत्पुर्वी रात्री गडगाव (सि.) मध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी या कॅन्डल मार्चमध्ये महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील प्रमुख मार्गावरुन हा वँâडल मार्च काढण्यात आला.

 

 

Previous Post

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठेतर नेत्यांवर वाढले हल्ले

Next Post

मराठा आरक्षण : रेल रोको आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल

Next Post
मराठा आरक्षण : रेल रोको आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल

मराठा आरक्षण : रेल रोको आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!