भूम – धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरात दुग्ध व्यवसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अंकुश गायकवाड व श्रीराम गायकवाड यांनी दुग्ध व्यवसायिक विशाल अंकुश चौधरी यांच्याकडून जनावरांमागे 10,000 रुपये खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी चौधरी यांना धमकावले व जनावरांच्या गाड्या पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले.
चौधरी हे १ मार्च, २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पार्डी घाटाजवळ जनावरांच्या गाड्या घेऊन जात होते. यावेळी आरोपींनी त्यांच्या गाड्या अडवून त्यांच्याकडे जनावरांच्या पावत्यांची मागणी केली. आरोपींनी जनावरांमागे 10,000 रुपये याप्रमाणे पैशाची मागणी केली. चौधरी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना धमकावले.
या घटनेची माहिती चौधरी यांनी भुम पोलीस ठाण्यात दिली. चौधरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अंकुश गायकवाड व श्रीराम गायकवाड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.