• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सप्टेंबरमधील खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांसाठी वाढीव भरपाई द्या

आमदार कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी

admin by admin
October 18, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत आणि फळबागांचे नुकसान झाले आहे, त्यांना महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार वाढीव नुकसान भरपाई थेट खात्यावर जमा करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यासह राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मूग, मका, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे होऊन शासनाने मदतही जाहीर केली. मात्र, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. ऑगस्टमध्ये केवळ पिकांचे नुकसान झाले होते, परंतु सप्टेंबरमधील पावसाने त्याच पिकांखालील जमीन खरडून नेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ऑगस्टपेक्षा अधिक झाले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एकदाच मदत देण्याचा नियम आहे. जुलै-ऑगस्टमध्ये मदत मिळाल्याने, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना अडचण येत आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ऑगस्टमध्येच सर्व क्षेत्र नुकसानग्रस्त दाखवल्याने, सप्टेंबरमध्ये जमीन खरडून गेल्यावरही त्यांना भरपाई मिळण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.

आमदार कैलास पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, जुलै-ऑगस्टमध्ये प्रामुख्याने कोरडवाहू पिकांचे पंचनामे झाले होते. मात्र, सप्टेंबरमधील अतिवृष्टीने फळबागांचेही मोठे नुकसान केले आहे, ज्याचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने केले आहेत. हे नुकसान ऑगस्टच्या तुलनेत अधिक तीव्र असल्याने, सप्टेंबरमध्ये खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना पंचनाम्यानुसार भरपाई देणे आवश्यक आहे. याच आधारावर आमदार पाटील यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे ही मागणी केल्याचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी सांगितले.

Previous Post

कुंथलगिरी जैन मंदिरात धाडसी चोरी; दानपेटी फोडून १२ लाखांची रोकड आणि पितळी मूर्ती लंपास

Next Post

उमरगा तालुक्यातील डिग्गीत २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Next Post
उमरगा तालुक्यातील डिग्गीत २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

उमरगा तालुक्यातील डिग्गीत २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!