• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरातील सर्व्हिस रोडच्या कामाची आमदार कैलास पाटील यांच्याकडून झाडाझडती;

 निकृष्ट कामाबद्दल अधिकाऱ्यांना फैलावर

admin by admin
May 18, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरातील सर्व्हिस रोडच्या कामाची आमदार कैलास पाटील यांच्याकडून झाडाझडती;
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव शहरातील बायपास रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोड, नाली आणि पथदिव्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कामाचा निकृष्ट दर्जा आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा तात्काळ सुधारण्याच्या सक्त सूचना दिल्या.

शहरालगत असलेल्या पोदार स्कूल ते अभियांत्रिकी महाविद्यालय या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोडचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत, रुग्णालये, मंगल कार्यालये, पेट्रोल पंप आणि शाळा या परिसरात आहेत. मात्र, सुरू असलेल्या कामांमध्ये नाल्यांची उंची अवाजवी वाढवण्यात आल्याने सर्व्हिस रोडवर येताना किंवा वळताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा म्हणून नाल्यांची उंची रस्त्याच्या पातळीनुसार करून नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.

यासोबतच, सर्व्हिस रोडच्या कडेला लावण्यात आलेले विद्युत खांबदेखील वेडेवाकडे उभारण्यात आले असून त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबींकडे लक्ष वेधत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना विद्युत खांबांची स्थिती सुधारण्याचे निर्देश दिले.

“कामाचा दर्जा सुधारला नाही आणि नागरिकांची गैरसोय सुरूच राहिली तर गय केली जाणार नाही,” असा इशारा देत आमदार पाटील यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले. सर्व्हिस रोडच्या कामाबद्दल नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केले.

या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे, प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, उमेश राजेनिंबाळकर, ॲड. निलेश बारखेडे, राज निकम, महेश शेरकर, ऋषिकेश धाराशिवकर, ॲड. पवन इंगळे, प्रदीप साळुंके, अक्षय खळदकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

तुळजापूरमध्ये ‘डिजिटल मटका’ आणि ‘राज’कारणाचा विचित्र खेळ! पोलिसांच्या धाडीने बिंग फुटले, ‘बिग बॉस’ फरार!

Next Post

तुळजापूर: पाण्याच्या बाटलीवरून ग्राहकाला मारहाण; बनावट पत्रकारासह तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

तुळजापूर: पाण्याच्या बाटलीवरून ग्राहकाला मारहाण; बनावट पत्रकारासह तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १४० कोटींची फेरनिविदा; दिवाळीनंतर कामांना सुरुवात, पण निवडणुकीच्या आचारसंहितेचं काय?

पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?

September 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?
  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!